top of page
  • Writer's pictureSmartOwl Finance

यश आणि पैशाच्या मार्गात कोणताही शॉर्टकट नाही.


8 नोव्हेंबर 2016. बरोबर 7 वर्षापूर्वीचा नोटबंदीचा हा दिवस कोण विसरू शकेल ? त्या दिवशी सकाळी बिटकॉइनचा दर भारतीय रुपयांमध्ये साधारण 32,000/- होता आणि आज सात वर्षांनंतर बिटकॉइनचा दर आहे 31,50,000/- म्हणजे जवळजवळ 98 पट जास्त. बिटकॉइन हे स्कॅम आहे म्हणणाऱ्यांना याहून मोठी चपराक कोणती असू शकते ?


आपल्या मराठी समाजात लहानपणापासून आर्थिक शिक्षण देण्याची पद्धत जवळजवळ नाहीच. शेअर मार्केटमध्येही आपला वाटा अगदी नगण्य. क्रिप्टोकरन्सीच्या या आर्थिक क्रांतीची मराठी माणसांना ओळख करून देण्यासाठी करोनाच्या काळात मी अगदी नाममात्र फीमध्ये मराठीतून कोर्स सुरू केला. त्यावेळीही अनेकांनी मला मूर्खात काढून हा कोर्स हिंदी किंवा इंग्रजीतून सुरू करण्याचा सल्ला दिला होता. पण मी हट्टाने कोर्स मराठीतच केला. आजवर जवळ जवळ 2000 च्या आसपास लोकांनी कोर्स केला.


बहुसंख्य लोकांनी माझ्या पोस्टवर वाट्टेल तशा कॉमेंट्स करण्यातच धन्यता मानली. सुरवातीला मी त्यांना उत्तर वगैरे द्यायचो. पण नंतर अशा लोकांकडे मी सरळ दुर्लक्ष करायला आणि त्यांच्या कॉमेंट्स एंजॉय करायला सुरवात केली. अशा कॉमेंट्स करणाऱ्यांचे ठराविक गट असतात. ते आता मला सहज ओळखता येतात. त्यातले काही मी इथे देत आहे.


1. क्रिप्टोकरन्सी स्कॅम आहे, फ्रॉड आहे असे म्हणणारे. या गटात कसलाही विचार न करता अति लोभाने, रातोरात करोडपती होण्यासाठी क्रिप्टोकरन्सी स्कॅम कॉईन्स, स्कॅम Apps, स्कॅम ट्रेडिंग App, क्रिप्टोकरन्सी सरक्युलेशन स्कीम यात पैसे गुंतवून बुडालेले लोक असतात. शेवटी आपला लोभ आणि मूर्खपणा लपवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीला बदनाम करून मोकळे होतात.


2. क्रिप्टोकरन्सीमध्ये भयंकर लॉस होतो, हे भयंकर रिस्की आहे असे म्हणणारे लोक. या गटात फेसबुक आणि WhatsApp यूनिवर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतलेले लोक असतात. हे लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. यूट्यूबवरील विडियो, मित्र, टेलिग्राम ग्रुप, अफाट प्रॉफिट मिळवून देण्याचे आश्वासन देणारी चॅनेल्स या सगळ्यांच्या सल्ल्याने कसलाही विचार न करता वाट्टेल त्या कॉईनमध्ये मोठ्ठ्या इन्व्हेस्टमेंट करतात, 100-125 लिवरेज घेऊन ऑप्शन किंवा फ्युचर ट्रेडिंग करतात. रिस्क मॅनेजमेंट वगैरे शब्द यांच्या गावीही नसतात. यांचे अकाऊंट लिक्विडेट होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरजच नसते. हे लोक यात संपूर्ण बुडतात आणि शेवटी पुन्हा क्रिप्टोकरन्सीला दोष देऊन मोकळे होतात.


3. क्रिप्टोकरन्सी भारतात किंवा जगात बेकायदेशीर आहे आणि सगळे जेलमध्ये जाणार आहेत हे सांगणारे लोक. या गटातील लोकही सोशल मीडियाच्या बातम्यांवरच जगत असतात. या बातम्या खऱ्या आहेत की नाही याची खात्री करायची तसदीदेखील हे लोक घेत नाहीत. सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीवरील बंदी काढून टाकली आहे, अर्थखात्याने क्रिप्टोकरन्सीला डिजिटल असेट म्हणून मान्यता दिली आहे, क्रिप्टोकरन्सीवर सर्व प्रकारचे टॅक्स लागू केले आहेत, शालेय अभ्याससक्रमात क्रिप्टोकरन्सीचा समावेश केला गेला आहे याची यांना गंधवार्ता नसते. आपल्याच जगात रमणारे हे लोक बिनधास्त कसल्याही अफवा पसरवतात आणि स्वतःला काहीही माहीत नसताना लोकांना सल्ले देत असतात.


4. काहीजण कमेन्ट करतात की “हे आपल्यासाठी नाहीये.” टिपिकल मराठी माणूस. “लेऊ लेणं गरीबीचं, चणं खाऊ लोखंडाचं”, “पैसा म्हणजे सर्वकाही नाही” अशा मूर्खासारख्या कल्पना मनाशी बाळगणारा. गुजराती, मारवाडी कसे पैसे कमवतात हे कौतुकाने सांगणारा. पण स्वतः कसलेही प्रयत्न न करणारा.


आज भारतात जवळजवळ 15 कोटी लोकांकडे क्रिप्टोकरन्सी अकाऊंट आहेत पण यात मराठी माणूस मागेच आहे. योग्य प्रशिक्षण घेण्याऐवजी रातोरात श्रीमंत होण्याकडे मराठी माणसाचा कल असतो. आज आपण नोकरी किंवा बिझिनेस करून जे पैसे कमावतो त्यासाठी आपण कमीतकमी 20-21 वर्ष शिक्षण घेतलं आहे हे आपण विसरतो. मराठी माणूस बुद्धिमान आहे पण त्याला कष्ट करायला नको, नवीन काही शिकायला नको, सगळं कसं आयतं आणि फुकट पाहिजे.


क्रिप्टोकरन्सी मध्ये केलेली थोडीशी गुंतवणूक भविष्यात तुम्हाला अनेक पटीने परतावा देऊ शकते हे विसरून चालणार नाही. पण याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की क्रिप्टोकरन्सीमध्ये डोळे किंवा कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता गुंतवणूक करता येणार नाही.

आज युट्युबसारख्या माध्यमांवर क्रिप्टोकरन्सीचं प्रशिक्षण मोफत उपलब्ध आहे. पण त्या हजारो व्हिडिओमधून नक्की कोणते व्हिडिओ आपण बघायचे हे शोधून काढणे नवख्या माणसासाठी जवळजवळ अशक्य आहे.


मोठ्या प्रमाणात होणारे स्कॅम जर आपण बघितले तर संपूर्ण प्रशिक्षण घेतल्याशिवाय क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक अथवा ट्रेडिंग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. पण त्याचबरोबर नेहेमीसारखे जगाच्या मागे न राहता, सुरवातीलाच या क्षेत्रात प्रवेश करून आपण आपला फायदा करून घेतला पाहिजे.

यश आणि पैशाच्या मार्गात कोणताही शॉर्टकट नाहीये हे आपण आपल्या मनावर कोरून ठेवलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. क्रिप्टोकरन्सीच्या रूपात इतिहासामध्ये प्रथमच सामान्य माणसाच्या पैशावर त्याचा स्वतःचा ताबा आला आहे. क्रिप्टोकरन्सीचे क्षेत्र सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला या मध्यम वर्गाच्या जाळ्यातून नक्कीच बाहेर काढू शकतं. आज गरज आहे ती आपण आपलं पहिलं पाऊल उचलण्याची. पहिलं पाऊल आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने.


कमीतकमी क्रिप्टोकरन्सीचा बेसिक कोर्स तरी सगळ्यांनी केलाच पाहिजे.

फक्त 999 रुपये | 35 विषय | 14 तासांचा विस्तृत अभ्यासक्रम

Join Basic Course in Digital Assets Today.

https://bit.ly/graphybasicmarathi


धन्यवाद डॉ. राजेश पटवर्धन

1 view0 comments

Comments


bottom of page