top of page
  • Writer's pictureSmartOwl Finance

क्रिप्टोकरन्सी : भविष्यातील आर्थिक क्रांती.


जकाल सर्व ठिकाणी व्यवहार डिजिटल होत असताना आपल्याला दिसतात. सर्व काही डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. अगोदर पैसे पाठवण्यासाठी पोस्ट, बँक इत्यादी गोष्टींचा वापर केला जायचा. पण आताच्या डिजिटल युगात पैसे पाठवण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन चा वापर केला जातो. ज्यात PhonePe, GooglePay इत्यादी ऍप्लिकेशन आहेत. पण आपण यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पैशाची देवघेव करू शकतो आणि पैसे कमवूही शकतो. या नवीन तंत्रज्ञानाचे नाव आहे क्रिप्टोकरन्सी.

जगातील कोणत्याही देशाच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी चलनाची आवश्यकता असते. जेणेकरून त्याचा वापर करून सहजतेने व्यवहार करता येईल. म्हणून प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे चलन आहे. जसे की, भारत देशाचे चलन रुपया, अमेरिकेचे डॉलर, यूरोपचे यूरो, जपानचे जापानी येन, इत्यादी. हे चलन एक भौतिक चलन आहे, जे आपण ज्या-त्या देशाच्या नियमांनुसार कोणत्याही ठिकाणी किंवा देशात ते वापरू शकतो आणि पाहू शकतो.

परंतु क्रिप्टोकरन्सी म्हणजे क्रिप्टो चलन हे जरा वेगळे आहे. आपण त्या चलनाला पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. कारण क्रिप्टो चलन हे प्रत्यक्ष स्वरूपात छापलेले नसते. म्हणून त्याला आभासी चलन असे म्हणतात.

आजच्या वेगवान जगात रोज तंत्रज्ञानाचे नवीन नवीन उच्चांक गाठले जात आहेत. यात क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन आणि ब्लॉकचेनबद्दल लोकांचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतच आहे. बिटकॉइन म्हणजे काय, ब्लॉकचेन म्हणजे काय याबद्दल वर्तमानपत्र, ब्लॉग किंवा पुस्तकांमधून खूप काही लिहिलं गेलं आहे. परंतु यात काहीशा क्लिष्ट भाषेमध्ये तंत्रज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे अर्थातच गरजेचं जरी असलं तरीही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मात्र याला फारसं महत्त्व नाही. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपण एक छोटसं उदाहरण घेऊया. जर एखाद्या मित्राच्या घरी लावलेली एलईडी ट्यूबलाईट बघून मला सुद्धा माझ्या घरी एलईडी ट्यूबलाईट लावायची असेल तर त्यासाठी मी एलईडी तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न करत नाही तर त्याचा वापर कसा करायचं ते शिकतो. मी सरळ दुकानातून एलईडी ट्यूबलाईट विकत आणतो आणि घरी त्याचा वापर सुरू करतो. तंत्रज्ञान आणि त्याचा वापर या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. माझे लेख तंत्रज्ञानाशी निगडित नसून त्याच्या वापराशी निगडित आहेत. आपल्याला या लेखांच्या माध्यमातून बिटकॉइन, ब्लॉकचेन किंवा क्रिप्टोकरन्सी काम कसे करते, कशी बनवली जाते किंवा त्यामागचं तंत्रज्ञान समजून घ्यायचं नाहीये तर आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात क्रिप्टोकरन्सीचा वापर करून आपली आर्थिक उन्नती कशी करून घ्यायची ते शिकायचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

Call & WhatsApp No : 91366 98168


2 views0 comments

Comments


bottom of page