top of page
Webpage BAnner_edited.jpg

अर्थमूलं कार्यम्
get ready for The Future

Basic Marathi.jpg
बेसिक कोर्स (मराठी)
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट
₹ 999/-
Intermediate Marathi.jpg
इंटरमिजिएट कोर्स (मराठी)
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट
₹ 9,999/-
Advance Marathi.jpg
Advanced कोर्स (मराठी)
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट
₹ 18,499/-
Basic + Intermediate Marathi.jpg
बेसिक + इंटरमिजिएट (मराठी)
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कोर्स
₹ 9,999/-
Intermediate + Advance Marathi.jpg
इंटरमिजिएट  + Advanced (मराठी)
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कोर्स
₹ 20,999/-
Basic + Intermediate + Advance Marathi.jpg
बेसिक + इंटरमिजिएट  + Advanced (मराठी)
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कोर्स
₹ 21,999/-
31 days.jpg
Personality Development (हिन्दी)
31 दिन : सफल और अर्थपूर्ण जीवन के लिए
 • क्या आप हर पल यादगार बनाना चाहते हैं ?

 • क्या आप आसान बदलावों से सफलता प्राप्त करना चाहते हैं ?

 • क्या आप अपने जीवन पर नियंत्रण रखना चाहते हैं ?

 • क्या आपको हर पल में खुशी की खोज करनी हैं ?

 • क्या आप एक परिपूर्ण जीवन का निर्माण करना चाहते हैं ?

499/-
48 laws.jpg
48 Laws of Success (हिन्दी)
अधिकार, सफलता और सत्ता ​के लिए
 • सफलता और सत्ता पाना चाहते हैं?

 • स्कूल से लेकर कॉर्पोरेट तक सफलता के 48 नियम

 • आकर्षण परम हथियार है, इसे बुद्धिमानी से उपयोग करके असीमित शक्ति प्राप्त करें।

 • चालाकी और करिश्मा के साथ, अपने भाग्य के स्वामी बनिए।

 • प्रलोभन शक्ति है, यह सबसे कठिन प्रतिद्वंद्वी को भी मिटा सकता है।

499/-
 • क्रिप्टोकरन्सी भारतात कायदेशीर आहे का ?
  भारतात क्रिप्टोकरन्सीच्या बाजूने किंवा विरुद्ध कोणतेही कायदे नाहीत. बऱ्याच देशात हीच परिस्थिति आहे. मार्च २०२० मध्ये, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीवर लादलेली बँकिंग बंदी काढून टाकली. क्रिप्टोकरन्सीमध्ये होणारे अफाट रकमेचे व्यवहार बघून सरकारने त्यावर GST, TDS आणि इन्कम टॅक्स असे सगळे टॅक्स लावले आहेत. आता बँका आणि अन्य वित्तीय संस्था व्यवहार करण्यास मोकळ्या आहेत. भारतीय लोक ट्रेडिंगसाठी एक्स्चेंज किंवा पीअर-टू-पीअर नेटवर्क वापरू शकतात. कोर्टाने सरकारला यासंदर्भातील मसुदा नियम तयार करून गोष्टी अधिक पारदर्शक करण्याचे आदेश दिले तेव्हा क्रिप्टोकरन्सीला चालना मिळाली. आज भारतात CoinDcx एक्स्चेंजवर जवळजवळ 1 कोटी 30 लाख तर वझिरएक्स एक्स्चेंजवर 60 लाखाहून अधिक भारतीय ट्रेड करत आहेत आणि रोज 17 ते 18 हजार नवीन लोक एक्स्चेंज जॉइन करत आहेत. याशिवाय इतर अनेक आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजवरही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक आहेत.
 • क्रिप्टोकरन्सी आभासी आहे म्हणून ते धोकादायक आहे आणि म्हणून नफ्याची शक्यता नाही, असे तुम्हाला वाटत आहे का ?
  क्रिप्टो हा डिजिटल चलनाचा एक प्रकार आहे जो आपण स्पर्श करु शकत नाही, पाहू शकत नाही आणि म्हणूनच बरेच लोक याला स्कॅम, फ्रॉड मानतात. परंतु जेव्हा लोक त्यावर गुंतवणूक करण्यास प्रारंभ करतात आणि प्रॉफिट मिळवतात तेव्हाच त्यांचे सगळे गैरसमज दूर होतात. क्रिप्टोमध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करत असतात आणि ही सोन्याइतकीच खरी मालमत्ता मानली जाते. स्टॉक, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट किंवा सोन्यासारख्या गुंतवणूकीच्या इतर प्रकारांमध्ये आपल्याला नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवावे लागतात. बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी अगदी 100 रुपयांच्याही खरेदी केल्या जाऊ शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अलिकडच्या वर्षांत शेअर मार्केट थंड असताना, सगळे गुंतवणुकीच्या परतव्याचे आकडे झपाट्याने खाली येत असतानाही, क्रिप्टोमार्केट अबाधित राहिले आणि गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिला.
 • क्रिप्टोकरन्सीचा वास्तविक जगात काय उपयोग आहे ?
  2021 पासून एखाद्या कंपनीचे मूल्यांकन मुख्यत्वे ते बिटकॉइन स्वीकारतात की नाही यावर अवलंबून व्हायला लागले आहे. बरेच ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवसाय त्यांनी प्रदान केलेल्या विविध सेवा आणि वस्तूंसाठी बिटकॉईन्स आणि इतर क्रिप्टोकरन्सी स्वीकारतात. खरं तर, जगातील सर्वात मोठ्या कंपन्या जसे स्टारबक्स, केएफसी, बर्गर किंग, पेपल इत्यादी बिटकॉइन व्यवहार स्वीकारतात. पुढे, बिटरिफिलचा वापर करून भारतात मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, सपनाओनिन आणि ओव्हर्स्टॉक सारख्या साइटवरून ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, विंडोज आणि एक्सबॉक्स स्टोअरमध्ये गेम्स खरेदी करण्यासाठी आणि अ‍ॅमेझॉन, मायन्ट्रा किंवा फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढू लागला आहे. बऱ्याच देशात अगदी सरकारी भरणादेखील क्रिप्टोकरन्सीमध्ये भरता येतो.
 • क्रिप्टोकरन्सी बेकायदेशीर व्यवहारासाठी वापरली जाते का ?
  क्रिप्टोकरन्सीच नाही तर जगातील प्रत्येक करन्सी बेकायदेशीर व्यवहारात वापरली जाते. बिटकॉइन काही काळ डार्क वेबवर पेमेंटसाठी वापरले जात असे, म्हणून बरेच लोक असे मानतात की क्रिप्टोकरन्सी केवळ अवैध व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. जर याच कारणासाठी बंदी घालायची असेल तर मग जगातील प्रत्येक चलन बंद करावे लागेल. अवैध व्यापार रोखण्यासाठी, नोंदणीच्या वेळी भारत आणि परदेशात प्रत्येक क्रिप्टो एक्सचेंजवर आता केवायसी अनिवार्य आहे.
 • क्रिप्टोकरन्सीवर कर भरावे लागतात का ?
  तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील इतर स्क्रिप्टप्रमाणे क्रिप्टोकरन्सीमधील तुमचा नफा आयकर कायद्यानुसार करपात्र आहे. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकींवर मुख्य भांडवलाच्या नफ्यावर कर आकारला जातो. भारतात क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर 30% इन्कम टॅक्स आहे.
 • बिटकॉइन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी ?
  बिटकॉइन ही पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. बरेच लोक क्रिप्टोकरन्सीचा संदर्भ देण्यासाठी ‘बिटकॉइन’ हा शब्द वापरतात. पण बिटकॉइन हा एकमेव क्रिप्टोकरन्सी नाहीये. आज क्रिप्टोकरन्सीच्या जगात अशी अंदाजे 12000 पेक्षाही जास्त कॉईन्स आणि टोकन्स आहेत ज्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता.
 • क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकीसाठी प्रचंड भांडवल आवश्यक आहे का ?
  वेगवेगळ्या एक्सचेंजमुळे आपण बिटकॉईन्ससह कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये कमीतकमी 100 रुपयांचीही गुंतवणूक करू शकतो. एखाद्या कंपनीचा शेअर 5000 रुपयांचा असेल तर आपल्याकडे 5000 रुपये असल्याशिवाय आपण तो घेऊ शकत नाही. याउलट आज बिटकॉइनची किंमत 20 लाखाच्या घरात आहे तरीही आपण 100 रुपयांचा बिटकॉइनचा छोटासा भाग विकत घेऊ शकतो. तशाच बाकीच्या क्रिप्टोकरन्सीसुद्धा आपण छोट्या छोट्या भागात विकत घेऊ शकतो.
 • क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार अनामिक आहेत का ?
  बऱ्याच लोकांची अशी चुकीची समजूत आहे की बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीचे सर्व व्यवहार अज्ञात किंवा गुप्त असतात. परंतु याउलट बिटकॉइन हे एक सार्वजनिक लेजर आहे आणि तो एका पत्त्यावरून दुसर्‍या पत्त्यावर क्रिप्टोकरन्सी किती आणि कधी पाठवली गेली याचा मागोवा घेतो. तसेच सर्व व्यवहारांची इत्यंभूत माहिती कोणीही बघू शकतो.
 • क्रिप्टोकरन्सी केवळ उच्च तंत्रज्ञान शिकलेल्या लोकांसाठी आहे का ?
  आमचा कोर्स करणारे बहुसंख्य लोक सर्वसामान्य शिक्षण घेतलेले आहेत तसेच ते लहान लहान गावातून आलेले आहेत. माझे तर असे मत आहे की खूप शिकलेले लोक अति चिकित्सकपणाच्या आहारी जातात आणि त्यातील फायद्याकडे दुर्लक्ष करतात. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना आपल्याला त्यामागचे तंत्रज्ञान समजून घेण्याची गरज नसते तर त्याचा वापर कसा करायचं हे शिकणे जरूरी असते. पण हे बहुसंख्य लोकांच्या लक्षातच येत नाही.
 • क्रिप्टोकरन्सी हॅक करण्यास सुलभ आहे का ?
  आपण आपले डेबिट कार्ड, मोबाइल व्यवहार किंवा बँकेचे व्यवहार करताना वापरतो तशीच सुरक्षितता आपल्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये बाळगावी लागते. जर सर्व नियम काटेकोरपणे पळून आपण व्यवहार केले तर तुमची क्रिप्टोकरन्सी कोणीही हॅक करू शकत नाही.
bottom of page